सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखाना कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्या वर कर्मचारी आरोग्य तपासणी शिबीर कार्यक्रम संपन्न

भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19 : सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह. साखर कारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार १०० दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर कर्मचारी आरोग्य तपासाणी शिबीराचे उद्घाटन कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जनकल्याण हॉस्पीटलचा सर्व स्टाफ,डॉ.सुधीर शिनगारे,कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.जयश्री शिनगारे, डॉ.आनंद कुलकर्णी, डॉ.अमृता म्हेत्रे,डॉ.कु. शुभम शिनगारे, डॉ.कु.अंजली नागटिळक यांच्या उपस्थितीत कारखान्यांतील कामगारांची तसेच कारखाना कॉलनीतील कामगारांच्या कुटूंबातील सदस्यांचीही आरोग्य तपासणी करुन त्यांना मोफत औषधे देण्यात आली.कारखान्याचे संचालक मोहन नागटिळक यांच्या कन्या डॉ.कु.अंजली नागटिळक व डॉ.सुधीर शिनगारे यांच्या कन्या डॉ.कु.शुभम शिनगारे यांनी वैद्यकीय पदवी मिळवल्याबद्दल कारखान्याचे चेअमरन कल्याणराव काळे यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कारखान्याचे संचालक सर्वश्री मोहन नागटिळक, शंकर महाराज चव्हाण, अमोल माने, अरुण नलवडे, विक्रमसिंह बागल, युवराज दगडे, भारत आंबुले, अर्जुन जाधव, राजाराम माने,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पी.डी. घोगरे व कारखान्याचे अधिकारी कर्मचारी, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top