तपकिरी शेटफळ गावचा राज्यसेवा परिक्षेत महाराष्ट्रभर डंका

तपकिरी शेटफळ गावचे एकाच महिन्यात तीन आँफीसर राज्य सेवा परिक्षा देऊन झाले असून यामध्ये किरण किसन महामुरे यांची महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा 2024मध्ये सहाय्यक संचालक वित्त व लेखा (Class -1)CAFO/MFAS (महाराष्ट्र शासन) पदी नियुक्ती झाली.तसेच प्रशांत चिंतामणी पळसे व नवनाथ रामचंद्र मासाळ यांची भारतीय सैन्य दलात नुक्तीच निवड झाली त्याबद्दल तपकिरी शेटफळ ग्रामस्थांच्या वतीने तीनही अधिकाऱ्यांचे यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला .या प्रसंगी किरण महामुरे यांनी तरुण युवक पिढीला प्रत्येक गोरगरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी वाचनालयाची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले .तसेच चिंतामणी पळसे यांनी जे नवयुवक आज भारतीय सैन्य दलात जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यापाठीशी खंबीरपणे उभा राहण्याचे आश़्वासन दिले .

Leave a Reply

Back To Top