
गोपाळपूर जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाकडून फुलचिंचोली येथील प्रियांका अशोक परांडे या प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. प्रचारात घेतलेली आघाडी व त्यांना वाढता पाठिंबा पाहता विजय निश्चित आहे.
पेनुर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काल शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा पार पडली यावेळी गोपाळपूर जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार प्रियांका परांडे यांनी स्टेजवरच एकनाथ शिंदे यांना आपली अडचण सांगितली. तात्काळ एकनाथ शिंदे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेत तुम्ही लढत रहा तू माझी छोटी बहीण असून हा भाऊ तुझ्या पाठीशी उभा असल्याचे सांगत त्यांच्या पाठीवर थाप टाकत प्रियांका परांडे यांना लढण्यासाठी बळ दिले असल्याचे यावेळी उपस्थित शिवसैनिक व कार्यकर्त्यातून बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या या प्रेरणेमुळे प्रियांका परांडे यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारे उत्साह संचारला असून निवडणुकीमध्ये मोठा ट्विष्ठ निर्माण झाला असल्याची चित्र सध्या दिसत आहे.
