अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ लागू करणेबाबत आझाद मैदानावार लहुजी शक्ती सेनेचे एक दिवशीय मह धरणे आंदोलन सुरु आहे. आज या बाबतचे निवेदन पंढरपूर तहसीलदार यांना लहुजी शक्ती सेनेच्या वतीने देण्यात आले.
देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 01 ऑगस्ट 2024 रोजी आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या बाजूने एक ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक राज्याने करावी.
असा महत्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने अनंत बदर समिती स्थापन करून त्या समितीचा अहवाल तात्काळ राज्य शासनाला सादर करण्यात यावा.
परंतु या समितीने कोणताच अहवाल सादर केला नाही. दि14 ऑक्टोबर 2024 रोजी समितीचा अहवाल न आल्याने राज्य सरकारने आरक्षण वर्गीकरण चा निर्णय जाहीर केला नाही. 13 मार्च 2026 रोजी समितीची मुदत संपली असून.
अनुसूचित जातीमधील वंचित जात घटकांना आरक्षण उप वर्गीकरणाचा निर्णय न झाल्याने या जाती लाभापासून वंचित राहिल्या. तसेच अनुसूचित जातीचे आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ राज्य शासनाने करावे व वंचित जात घटकांना न्याय द्यावा.
तसेच. लातूर येथील नवोदय विद्यालय मधील अनुष्का पाटोळे व आकांक्षा गायकवाड या विद्यार्थिनीच्या मृत्यूची सी बी आय.मार्फत चौकशी करण्यात यावी.या मागण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तहसील कार्यालय संघटनेच्या वतीने महाधरने आंदोलन व निवेदन देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र महासचिव देविदास कसबे, पंढरपूर तालुकाध्यक्ष जयसिंग मस्के,
संपर्कप्रमुख मुकुंद घाडगे,
युवक तालुकाध्यक्ष समाधान वायदंडे, जिल्हा सचिव बापू घाडगे, कलावंत आघाडी अध्यक्ष आप्पा वाघमारे, तालुका उपाध्यक्ष सदाशिव कसबे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी खिलारे, मल्हारी फाळके, पप्पू वाघमारे, आदी पदाधिकारी उपस्थित होते
