गणपती फार्मसी मध्ये गुणवत्तापूर्ण – सुदर्शन तळेकर

गणपती फार्मसीमध्ये माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

मौजे अकोले खुर्द, टेंभुर्णी येथील श्री गणपती फार्मसी महाविद्यालय येथे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याचे प्रतिपादन अभिमन्यु शिक्षण प्रसारक मंडळ, केम या संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन तळेकर यांनी केले. १४ जून २०२६ रोजी डी. फार्म आणि बी. फार्मच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाला २०२० ते २०२५ या शैक्षणिक वर्षामध्ये औषधनिर्माणशास्त्र पदवी व पदविका संपादन केलेले माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतपर भाषणाने झाली. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत जुन्या मित्र-मैत्रिणींशी आणि शिक्षकांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक अनुभवांची देवाणघेवाण करून सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेच्या प्राचार्या डॉ. आर. आर. बेंदगुडे यांनी माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करत संस्थेच्या प्रगतीमध्ये त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी उपस्थितांचे आभार मानत भविष्यातही संस्था व माजी विद्यार्थ्यांमधील संबंध अधिक दृढ राहतील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बाबा येडगे उपस्थित होते.

  • कार्यक्रमात माजी विद्यार्थांना सन्मानचिन्ह वितरण, मुक्त संवाद, समूह छायाचित्र आदींचा समावेश होता. कार्यक्रम समन्वयक म्हणून डॉ. प्रशांत मिसाळ व प्रा. धनश्री करांडे यांनी काम केले.

Leave a Reply

Back To Top