श्री गणपती फार्मसीमध्ये बी. फार्मसी साठी स्क्रुटिनी सेंटर उपलब्ध

मौजे अकोले खुर्द (प्रतिनिधी)
श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च, अकोले खुर्द टेंभुर्णी येथे प्रथम वर्ष बी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया स्क्रुटिनी सेंटर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन प्रक्रिया 31 जुलै पासून 10 ऑगस्ट 2026, सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून विद्यार्थ्यांनी प्रथम वर्ष बी. फार्म प्रवेशासाठी उपस्थित राहून फॉर्म भरणे व ते पुष्टी करणे प्रक्रिया महाविद्यालयामध्ये पूर्णतः फ्री असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. सोबत येताना सर्व कागदपत्रांच्या 2 प्रति व फोटो आणणे आवश्यक असून संपूर्ण प्रक्रिया साठी महाविद्यालयाची एफसी टीम आपणांस पूर्ण सहकार्य करेल. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे म्हणाल्या की दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा फार्मसी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असून महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष डी. फार्मसी, थेट द्वितीय वर्ष बी. फार्मसी व एम. फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरू असून याबद्दल लागणारी सर्व माहिती महाविद्यालयामध्ये ऍडमिशन सेल मध्ये मिळेल, सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः भेट देऊन आपला फॉर्मची सुनिश्चित करा. अधिक माहितीकरिता 7745082754 वर संपर्क साधावा.

← Back

Thank you for your response. ✨

← Back

Thank you for your response. ✨

Leave a Reply

Back To Top