- पंढरपूर / संतोष मोरे
शिवसेना ओबीसी प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर, उपस्थित सोलापूर जिल्हा ओबीसी जिल्हाध्यक्ष राजकुमार हिवरकर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष लोखंडे, सोलापूर ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भोसले यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, या तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची पद नियुक्तीचे पत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी ओबीसी प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर यांनी महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री व तथा उपमुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीसाठी एक भेट म्हणून त्यांना 50% सवलती मध्ये शिलाई मशीन दहा हजार नग वाटप करण्याचे उद्देश त्यांनी पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहे. तरी लाडक्या बहिणीसाठी व अनेक जनसामान्य जनतेच्या योजना राबवत आहेत आरोग्य ही योजना, साठ वर्षे पूर्ण झालेल्या त्यांच्यासाठी पेन्शन योजना व मोफत आरोग्य आयुष्यमान कार्ड या सर्व योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची काम सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी करावी अशी भावना शिवसेना प्रदेशाध्यक्ष रमेश बारस्कर यांनी संपूर्ण शिवसेना कार्यकर्त्यांना आपल्या शिवसेना गाव तिथे शाखा या पद्धतीने शिवसेनेचा मोठ्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता तयार झाला पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना त्यांनी पंढरपूर येथे ओबीसी सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या वेळेस त्यांनीही सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.
त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेधही करण्यात आला, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी श्रीकांत ( दादा) शिंदे यांचेही हात बळकट करण्यासाठी सर्व शिवसेना कार्यकर्त्यांनी आपल्या प्रत्येक तालुक्यामध्ये व गावांमध्ये शिवसैनिक तयार करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या शिवसेना कार्याची व सामान्य जनतेपर्यंत व सर्व तळागाळातील लोकांपर्यंत शिवसेनेची चाललेली ही जनतेपर्यंत प्रत्येकाला आरोग्यविषयक, मोफत व्यवस्था, व साठ वर्षाखालील सर्व लोकांना आयुष्यमान कार्ड पाच लाखापर्यंत आरोग्य व्यवस्था मोफत असणार आहे याची माहिती सर्व जनतेला व तळागाळातील लोकांना सांगून शिवसेना कशा पद्धतीचे काम करत आहे ही सर्व योजना सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी करावे असेही आव्हान श्री राजकुमार हिवरकर पाटील यांनी पंढरपूर येथील ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या निवडी व मेळावा यामध्ये त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे.
