पंढरपूर/ संतोष मोरे
मौजे अकोले खुर्द ,ता. माढा येथील ‘श्री गणपती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस अँड रिसर्च’ महाविद्यालयातील ५ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे या विद्यार्थ्यांची बेंगलोर आणि हैदराबाद येथील कंपन्यांमध्ये उच्च पदांवर निवड झाली असून, त्यांच्या या यशामुळे परिसरात कौतुक होत आहे.महाविद्यालयातील विद्यार्थी ओंकार कृष्णा कोरडे, दत्तात्रय उत्तम भानवसे आणि अक्षय ब्रह्मदेव गायकवाड यांची हैदराबाद येथील ‘वर्चो बायोटेक’ कंपनीत ‘ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह’ पदावर निवड झाली आहे. तसेच सचिता सुधाकर गावडे आणि अनिकेत बाबासो राजे-घाडगे यांची बेंगलोर येथील ‘मायलन लॅबोरेटरीस्’ कंपनीमध्ये ‘क्वालिटी असुरेन्स ऑफिसर’ म्हणून निवड झाली आहे.विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे, उपाध्यक्ष बाबा येडगे आणि महाविद्यालाच्या प्राचार्या डॉ. रुपाली बेंदगुडे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. या प्लेसमेंटसाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. नामदेव शिंदे, डॉ. प्रशांत मिसाळ, प्रा. शिवराज ढगे, प्रा. सूरज वाघमोडे आणि सर्व शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
